Translate

Thursday, June 18, 2020

anubhuti - Hindi Poem Site

अनुभूती कविताओं का कांत कलेवर

http://www.anubhuti-hindi.org/


हिंदी कवितांची वाचकांसाठी “अनुभूती कविताओं का कांत कलेवर” एक अत्यंत उपयुक्त अशी वेबसाईट आहे. वेबसाईट च्या मुखपृष्ठावर  ‘अनुभूती’ मासिकाचा अंक, संपर्क ई –मेल, ‘अभिव्यक्ती तुक-कोश’ हा हिंदी भाषेतील शब्द समानता शोधण्याची सुविधा दिलेली आहे. प्रामुख्याने या ‘अनुभूती कविताओं का कांत कलेवर’ वेबसाईट मध्ये खालील प्रमुख काव्य विभाग आहेत. या ब्लॉग पोस्ट मध्ये “अनुभूती कविताओं का कांत कलेवर” च्या प्रत्येक विभागाच्या नावावर किंवा फोटोवर सुद्धा क्लिक केल्यानंतर त्या विभागावर जाण्याची लिंक  दिलेली आहे.

 अंजुमन



या विभागामध्ये हिंदी भाषेतील नवीन–जुन्या शायरांच्या अल्पपरिचयसहित निवडक गझल आहेत.

उपहार


  या विभागामध्ये कविता वाचनाचा अवर्णनीय आनंद घेण्यासाठी भावनेने ओथंबलेल्या कविता काही चित्रासहीत दिलेल्या आहेत. यामध्ये होली - ३ , दीपावली - ४, देशप्रेम - ३, विजयादशमी- १, शिशुजन्म- १, नाय साल- २, जन्मदिन- ६, प्रकृति- ४, माँ के लिए- १  अशा शिर्षकाखाली कविता दिलेल्या आहेत.

काव्य संगम



 सध्या या विभागामध्ये भारत देशातील प्रसिद्ध कवी, विचारवंताच्या विविध भाषेतील काही कविता व हिंदी भाषांतरित कविता हि दिलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील व्यक्तींच्या कवितांचा समावेश आहे. अमृता प्रीतम की पंजाबी कविताएँ, आ.प.जै. अब्दुल कलाम की तमिल कविता,  रवीन्द्रनाथ ठाकुर की बंगाली कविताएँ, गजानन दिगंबर माडगुलकर की मराठी कविताएँ, उमाशंकर जोशी की गुजराती कविताएँ, जी शंकर कुरुप की मलयालम कविताएँ, डॉ. दुष्यंत कुमार की राजस्थानी कविताएँ, पुश्किन की रूसी कविताएँ, बशीर अतहर मलिक की कश्मीरी कविताएँ, रूपा धीरू की मैथिली कविताएँ, सात विभिन्न भाषाओं के प्रतिष्ठित कवियों की देशभक्ति रचनाएँ.

गीत



गीत (गाणे) हिन्दी साहित्य चा लोकप्रिय प्रकार आहे यामध्ये एकूण २१७ प्रसिद्ध कवींच्या / गीतकारांच्या अल्पपरिचयसहित गीत, नवगीत और अनुगीत इत्यादि गीतच्या विविध अशा रचना या विभागामध्ये दिलेल्या आहेत.

गौरव ग्राम



सध्या या विभागामध्ये एकूण ४७ प्रसिद्ध कवींच्या अल्पपरिचयसहित कविता आहेत.

  गौरव ग्रंथ



  या विभागामध्ये ०९ प्रसिद्ध व्यक्तींच्या हिंदी काव्य रचना दिलेल्या आहेत.

दोहे



 या विभागामध्ये ७० व्यक्तींचे दोहे याप्रकारच्या एकूण ९३ हिंदी कविता आहेत.

पुराने अंक



 सध्या या विभागामध्ये ‘अनुभूती कविताओं का कांत कलेवर’ या मासिकाचे जुने अंक जानेवारी २००३ पासून ते मे २०२० पर्यंतचे  वाचकांसाठी उपलब्ध आहेत.

संकलन

    या विभागामध्ये एकाच विषयावर असलेल्या जुन्या व नवीन कवितांचा संग्रह आहे. यामध्ये मोसम (ऋतु), पर्वो (सण), देशभक्ती, परिवार, फुल या विषयावर कविता संग्रहित आहेत. तसेच ‘हिंदी कि १०० सर्वश्रेष्ठ प्रेम कविताए’ या विषयावर कार्य चालू आहे.  

कुण्डलिया छंद



   या विभागामध्ये हिंदी काव्यप्रकार कुंडलिया दिलेल्या आहेत. तसेच ‘कुंडलिया कैसे लिखे’ हा माहितीपर लेख दिलेला आहे. गंगा, वर्षा, विजय पर्व, माँ, नया साल, भगवान राम के लिये या विषयावर व इतर हि विषयावर कुंडलीया आहेत.

 हाइकु



 हाइकु हा मूलतः जापानी साहित्यप्रकार असून तो हिंदी साहित्यामध्ये हि येत आहे. हायकू या प्रकारामध्ये १७ अक्षरात सर्वात लहान कविता लिहलेली असते. या विभागामध्ये हाइकु कैसे लिखे हा लेख आहे तसेच ३८ व्यक्तींचे हाइकु कविताप्रकार आहेत आणि होली हाइकु¸ फागुनी हाइकु   कुछ हाइकु माँ के लिए, मौसमी हाइकु¸ वसंती हाइकु, गुलमुहर हाइकु, वर्षा में मन (३ हाइकु), वर्षा (७ हाइकु),  पानी बरसा (१४ हाइकु), उमस भरा सावन (२ हाइकु), माँ (१३ हाइकु), वसंत के हाइकु, शरद महोत्सव या विषयावर सुद्धा हाइकु कविताप्रकार वाचनासाठी उपलब्ध आहेत.

  हास्य व्यंग्य



  या विभागामध्ये प्रसिद्ध अशा ३३ कवींच्या अल्पपरिचयासहित काही ‘हास्य व्यंग्य’ कविता दिलेल्या आहेत

 क्षणिकाएँ 



  या विभागामध्ये एकूण २९ कवींच्या एका वाक्यात किंवा काही ओळीत असणाऱ्या अत्यंत लहान कविता आहेत.

दिशांतर



   या विभागामध्ये इतर विविध देशात राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या कविता दिलेल्या आहेत.

रचनाकारो से

या विभागामध्ये अभिव्यक्ती आणि अनुभूती मासिकामध्ये लेख , कविता पाठवण्यासाठी संपर्क, सूचना, नियम दिलेले आहेत.




No comments:

Post a Comment

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

Dr. Tara Bhawalkar related Selected Ph.D Theses, Videos, Other Information Sources

डॉ. तारा भवाळकर    यांच्याशी संबंधित निवडक  पीएच. डी. प्रबंध,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत    Image Address :  https://feeds.abplive.com/onec...