महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - वेबसाईट माहिती
https://sahitya.marathi.gov.in/
स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक गरजा आधीच हेरुन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री. यशवंतरावजी चव्हाण यांनी दिनांक १ मे १९६० रोजी, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली त्यात मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्याची प्रगती होईल असे आश्वासन दिले होते. त्याच धोरणानुसार महाराष्ट्राचे साहित्य, इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक १९ नोव्हेंबर १९६० रोजी शासनाने "साहित्य संस्कृती मंडळाची" स्थापना पहिल्यांदा पाच वर्षाकरिता केली. त्यानंतर वेळोवेळी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर वेळोवेळी अनेक मान्यवर साहित्यिक व विचारवंतांची नियुक्ती या पदावर झाली. सध्या डॉ. सदानंद मोरे दिनांक २६ डिसेंबर, २०१८ पासून अध्यक्षपदी कार्यरत आहेत. (https://sahitya.marathi.gov.in/)
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या प्रमुख योजना
१. मंडळाची पुस्तक प्रकाशन योजना
२. ललित व ललितेतर वांग्मायाच्या प्रकाशनार्थ अनुदान
३. नवलेखक उत्तेजनार्थ अनुदान योजना
४. नवलेखकांची चर्चासत्रे / कार्यशाळाना अनुदान योजना
५. साहित्य संस्थाना अनुदान
६. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अनुदान
७. नियतकालिकांना अनुदान
८. स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाण्ग्मय पुरस्कार योजना
९. जेष्ठ साहित्यकास विंदा करंदीकर
जीवन गौरव पुरस्कार
१०. श्री . पु . भागवत पुरस्कार
११. अन्य मराठी साहित्य संमेलनाना अनुदान योजना
१२.बृहद्ग्रंथ प्रकल्प योजना
वरील योजनाची विस्तृत माहिती https://sahitya.marathi.gov.in/ वेबसाईट वर मिळेल तसेच मंडळाची प्रकाशना ची यादी व प्रकाशने मिळण्याच्या ठिकाणाची माहिती व जिल्ह्यानिहाय ३८ खाजगी वितरकांची नावे दिली आहेत.
दिव्यांग व्यक्तीसाठी हि वेबसाईट (संकेतस्थळ) सोप्या रीतीने वापरता यावी साठी वेबसाईट वरील ♿ या चिन्हांस क्लिक करावे त्यानंतर खालील प्रकारच्या सुविधा प्राप्त करता येतात.
-
Increase Text
– यावर क्लिक करून
वेबसाईट मधील शब्दांचा आकार वाढवता येतो जेणेकरून वाचण्यास त्रास होणार नाही.
-
Decrease Text – यावर क्लिक करून वेबसाईट
मधील शब्दांचा आकार लहान करता येतो जेणेकरून वाचण्यास त्रास होणार नाही.
-
Grayscale - यावर क्लिक करून वेबसाईट विनाकलर/ कृष्णधवल रुपात दिसते जेणेकरून
विविध रंगांचा त्रास होऊ नये.
- High Contrast , Negative Contrast, Light Background, Links Underline, Readable Font, Reset या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.
या वेबसाईट वर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट ईमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी ची सुविधा https://sahitya.marathi.gov.in/ उपलब्ध आहे. दिनांक ७ जून २०२० पर्यंत या वेबसाईट वर ६२,७८१ व्यक्तींनी भेट दिलेली आहे.
https://sahitya.marathi.gov.in/ या वेबसाईट चा वापर जास्तीत जास्त वाचकांनी करण्यासाठी वरील माहिती ब्लॉगवर देण्याचा अल्पसा प्रयत्न आहे.
विस्तृत माहितीसाठी https://sahitya.marathi.gov.in/ भेट द्यावी.
संदर्भ : https://sahitya.marathi.gov.in/
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे