काव्यालय - हिंदी कवितांचा अप्रतिम खजिना
हिंदी कवितांच्या वाचकवर्गासाठी ‘काव्यालय’ ही वेबसाईट कवितांचा अप्रतीम खजिनाच आहे. ‘काव्यालय’ या वेबसाईटची सुरुवात १९९७ मध्ये झाली. वाणी मुरारका यांनी हिंदी कविता देवनागरी भाषेत इंटरनेटवर संकलित करण्यासाठीच्या प्रयत्नातून वेबसाईट तयार झाली. वाणी मुरारका आणि विनोद तिवारी ही ‘काव्यालय’ या वेबसाईटचे संपादक व कार्यवाहक आहेत. डॉ. विनोद तिवारी हे जून २००१ या वर्षी ‘काव्यालय’ चे सहसंपादक झाले. वाणी मुरारका या सॉफ्टवेअर निर्माता आणि कवी आहेत तर विनोद तिवारी हे भौतिक शास्त्रज्ञ व कवी आहेत.
‘काव्यालय’ या वेबसाईट मध्ये खालील प्रमुख विभाग आहेत. या ब्लॉग पोस्ट मध्ये ‘काव्यालय’ च्या प्रत्येक विभागाच्या नावावर किंवा फोटोवर सुद्धा क्लिक केल्यानंतर त्या विभागावर जाण्याची लिंक दिलेली आहे.
शिलाधार- विसाव्या शतकाच्या पूर्वीच्या कविता
या विभागामध्ये एकूण १२ कवींच्या २७ कविता आहेत. या कवीमध्ये अमिर खुसरो -१, कबीर दास-३, केशवदास-३, गोस्वामी तुलसीदास-२, चंद वरदायी-१, बिहारी-१, भारतेंदु हरिश्चंद्र-१, मिराबाई- ६, रसखान- १, रसलीन-१, रैदास-१, सूरदास-६ यांच्या कवितांचा समावेश आहे.
युगवाणी - विसाव्या शतकांच्या प्रारंभ ते समकालीन कविता
या विभागामध्ये ‘कवी नामानुसार’ यावर क्लिक
केल्यास अ ते ह नुसार कवी च्या नावाची यादी कवितासहित पाहाता येते. यामध्ये एकूण
८९ कवींच्या एकूण १८८
कविता आहेत.
या विभागामध्ये सध्या एकूण १२ कविता आहेत या कविता बंगाली,
मारवाडी, नेपाळी, ओडिया, पेलीश, संस्कृत, उर्दू या भाषेतील कविता व त्यांची हिंदी
भाषांतरित कविता हि दिलेल्या आहेत.
या विभागामध्ये सध्या एकूण ७१ कवींच्या ८० कविता
आहेत.
या विभागामध्ये एकूण ३० कवितांचे आपण वाचन करू शकतो तसेच सुमधुर आवाजात
कविता ऐकूहि शकतो. याव्यतिरिक्त विशेषताः धर्मवीर भारती यांची ‘कनुप्रिया मुखरित हुई’
या काव्याच्या पाच कवितांचे व्हिडिओ व माहिती दिलेली आहे तसेच महाकवी महादेवी
वर्मा यांची ‘पंथ होने दो अपरिचित’ ही कविता लिखित व ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे व
महाकवी महादेवी वर्मा यांच्या जीवन पटाचा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे.
या विभागामध्ये कवितांच्या काही ओळी चारोळी सारख्या दिल्या आहेत.
या विभागामध्ये ‘कवी और काव्यधन’, काव्य शिल्प,
काव्यालय संचालन की झलकिया, अन्य या ऊपशीर्षकाखाली हिंदी कवितेवरील लिहिलेले लेख व
निबंध दिलेले आहेत.
संग्रह से कोई भी रचना
यावर दरवेळेस क्लिक केल्यानंतर नवीन कविता
वाचावयास मिळते.
या विभागात ‘काव्यालय’ मध्ये आपण खाते उघडून स्वतःची कविता काव्यालय मध्ये समाविष्ट करण्यासाठी पाठवू शकतो सध्या ही प्रक्रिया काही कालावधीसाठी सुरु नाही.
काव्यालय वेबसाईट वरील अप्रतिम कविता, संपादक टिपणी प्राप्त करण्यासाठी ‘ई-मेल दर्ज करे’ ही सुविधा दिलेली आहे.
साधारणतः महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शुक्रवारी नवीन कविता काव्यालय मध्ये प्रकाशित होतात.
संपर्क करे – यामध्ये वेबसाईट वर संपर्क करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म दिलेला आहे किंवा kaavyaalaya@gmail.com यावर ई-मेल करू शकता.
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे