Mahatma Gandhi University Online Theses Library
http://www.mgutheses.org/
या थेसिस रिपॉझिटरीजमध्ये संस्कृत, मल्याळम,
हिंदी व इंग्रजी भाषेतील १००० पेक्षा जास्त पीएच.डी प्रबंध उपलब्ध आहेत. यामध्ये प्रबंध शोधण्यासाठी खालील
प्रकारचे दोन मार्ग आहेत
अ) Search –
यामध्ये Content and Title, Scholars, Guide, Accession No. यापैकी एक निवडून प्रबंध शोधता येतो. हे सर्व पर्याय प्रथमदर्शी पानावरच
आहेत. तसेच यामध्ये Keyboard चे बटन असून त्यावर क्लिक करून मल्याळम, तमिळ, हिंदी,
कन्नडा, इंग्रजी भाषा निवडून प्रबंध शोधता येतात.
ब) Advance Search
Advance Search |
- यामध्ये क्लिक करून प्रबंध - Title, Contents, Scholars, Guide, Keywords यापैकी
पर्याय निवडून प्रबंध शोधता येतो.
- AND,
OR, NOT यापैकी निवडून प्रबंध शोधण्यासाठी च्या संज्ञाची व्याप्ती
कमी- जास्त किंवा यापैकी नाही करून शोधता येते.
- Branch of Study यावर क्लिक करून विविध विषयाच्या नावापैकी एखादा आवश्यक
विषय निवडून विशिष्ट संज्ञा (term) टाकून हि शोधता येते.
- Center of Research वर क्लिक करून महाविद्यालय, संस्था, विभागाच्या यादीतून
विशिष्ट अशा संस्था/ विभागाचे प्रबंध शोधता येतात.
- Result per Page वर क्लिक करून २०,४०,६० यापैकी निवडून प्रत्येक पानावर तेवढी
प्रबंधाची यादी पाहता येते.
- Sorts item by वर क्लिक करून Title, Author, Guide
नुसार प्रबंधाची मांडणी पाहता येते.
- In Order वर क्लिक करून प्रबंध ascending किंवा descending रचनेनुसार पाहता
येतात.
- Theses from year व till year यामध्ये १९७५ ते २०१९ पर्यतची वर्ष दिलेली
आहेत त्यापैकी वर्ष निवडून ठरविक वर्षामधील प्रबंध शोधता येतात.
- या थेसिस रिपॉझिटरीच्या प्रथमदर्शी पानावरच Author listing वर क्लिक केल्यावर Scholar
(संशोधकाच्या) नावाच्या A ते Z नुसार प्रबंध पाहता येतात.
- या थेसिस रिपॉझिटरीच्या प्रथमदर्शी पानावरच Title listing वर क्लिक केल्यावर प्रबंधाच्या
(Title) शिर्षकाची यादी A ते Z नुसार प्रबंध पाहता येतात.
- या थेसिस रिपॉझिटरीच्या प्रथमदर्शी पानावरच Mahatma
Gandhi University Library, Kerala येथील विद्यापीठ ग्रंथपाल यांचा ई –मेल - mgudigilib@gmail.com संपर्कासाठी दिलेला आहे.
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे